महालक्ष्मी एक्स्प्रेसचं नाव अंबाबाई एक्स्प्रेस करा- मागणी

कोल्हापूरहुन मुंबईला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसच नाव बदलून अंबाबाई एक्सप्रेस करावं, या मागणीसाठी कोल्हापूर रेल्वे  स्टेशनवर आंदोलन करण्यात आलं आहे.

अंबाबाई भक्त मंडळ, शाहु प्रेमी आणि शिवसैनिकानी हे आंदोलन केलं. अंबाबाई एक्स्प्रेस लिहिलेला एक प्रिन्टेड बोर्ड रेल्वेला यावेळी लावण्यात आला.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील श्री पुजकांनी आंबाबाईला विष्णु पत्नी महालक्ष्मी करण्याचा घाट घातला आहे,  असा आक्षेप आंबाबाई भक्त मंडळाचा आहे. याबाबतच कोल्हापूरात आंबाबाई भक्त मंडळ विविध मार्गानं आंदोलन करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *