CM हेलिकॉप्टर अपघाताला पायलट जबाबदार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर पायलटच्याच एका चुकीमुळे कोसळलं होतं, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजन असतानाही पायलटनं ‘टेक ऑफ’चा प्रयत्न केल्यानंच हा अपघात घडल्याचं विमान अपघात तपास पथकाने (एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) आपल्या अहवालात नमूद केलंय.

लातूर जिल्ह्यातील निलंग्यात २५ मे रोजी मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते. उड्डाणानंतर काही सेकंदातच त्यांचं हेलिकॉप्टर खाली आलं होतं आणि एका विजेच्या खांबावर आदळून कोसळलं होतं. हेलिकॉप्टरच्या पंख्यातील बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात होतं.   अपघातामागील एका प्रमुख कारणाकडे लक्ष वेधलं आहे.

ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा लातूरमधील पारा चाळिशीपार होता. अशावेळी, हेलिकॉप्टर उड्डाणात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या क्षमतेपेक्षा कमी वजन घेऊनच उड्डाण करणं अपेक्षित असतं. परंतु, पायलटनं वजनाचा अंदाजच घेतला नाही. तसंच आणखी काही मानकांकडेही दुर्लक्ष केल्यानं थोड्याच उंचीवरून हेलिकॉप्टर खाली आलं, असं एएआयबीच्या अहवालात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *