कनेक्टिंग लिंकमुळे तीन महिन्यात प्रशासनाने कमावले 7 लाख रुपये, पण टोलमधून नाही तर…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवर अवजड वाहने, ज्वलनशील, धोकादायक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतूकीची बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. तीन महिन्यात तब्बल 621 बंदी असलेली वाहने या मार्गावरुन धावली आहेत. तर, प्रशासनाने या वाहनांविरोधात कारवाई करुन तब्बल 7 लाख 38 हजारांचा दंड वसूल केला आहे.

1 मे रोजी कनेक्टिंग लिंकचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महत्त्वकांक्षी द्रुतगती मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. खोपोलीतील रायगड ते कुसगाव लोणावळा असा हा मार्ग आहे. या मार्गामुळं दोन्ही शहरातील अंतर 6 किमीने कमी होणार असून प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचतो. या द्रुतगती महामार्गावर जड-अवजड वाहने आणि मालवाहू वाहनांना पूर्णपणे बंदी आहे. तरीदेखील ही बंदी झुगारून ही वाहने धावत आहेत. तर, दुसरीकडे वाहनचालक वेगमर्यादेचे पालन करत नसल्याचे चित्र आहे.

सात लाखांहून अधिक दंड वसूल

621 अवजड वाहनांवर कारवाई करुन ई चलनाद्वारे 7.38 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंडाची रक्कम वाढवण्यासह वाहन मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा विचार सुरू आहे. वाहतूक नियमांच्या कठोर पालनांसाठी एमएसआरडीसीकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

कनेक्टिंग लिंकवर वेगमर्यादा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्सप्रेस वे) कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) प्रकल्पासाठी महामार्ग पोलिसांनी वेगमर्यादा निश्चित केली आहे

हलकी मोटार वाहने: बोगद्यामध्ये ताशी 100 किमी वेगमर्यादा आहे.

बोगद्यामध्ये ताशी ८० किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

या मार्गावरील दोन बोगदे आणि दोन पुलांवर 24 तास सीसीटीव्ही नजर असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *