काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, ४ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरच्या बंदीपोराभागात सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्लयात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केलाय.

दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ४५ व्या बटालियनच्या कॅम्पला लक्ष्य केलं होतं. मात्र जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ४ दहशतवादी ठार झाले आहेत. दरम्यान लष्करानं आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या आर्थिक निधीचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने फुटीरतावादी नेत्यांसह अन्य काही ठिकाणी रविवारी पुन्हा छापे घातले. यामध्ये पाकिस्तानी चलनासह अन्य परदेशी चलन हस्तगत करण्यात आल्याची माहिती  अधिका-यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *