‘तुला शारीरिक संबंध…’; लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीने सांगितले हादरवणारे सत्य, घटस्फोटासाठी खर्च केले 10 लाख

अरेंज मॅरेजबाबत आजही भारतीय समाजाकडून अनेक अपेक्षा ठेवल्या जातात. आजही भारतातील काही ठिकाणी घरच्यांच्या पसंतीने व ठरवून लग्न केली जातात. मात्र लग्न लागल्यानंतर दोन अनोळखी लोक एकत्र राहिल्या लागल्यानंतर हळूहळू खटके उडायला लागतात. सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट चांगलीच व्हायरल होतंय.

एका तरुणाची सोशल पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. यात त्याने लिहिलंय की, 8 महिन्यांपासून तरुणीसोबत ओळख होती. त्यानंतर लग्न केलं पण लग्नाच्या पहिल्याच रात्री लग्न संपुष्टात आले. पत्नीने हे लग्न मानण्यास नकार दिला. त्यानंतर पत्नीसोबत घटस्फोट घेण्यासाठी त्यांना वेगळे होण्यासाठी तब्बल 2 वर्षे लागली. त्याचबरोबर 10 लाख रुपये खर्च करावे लागले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @fintech_shark नावाच्या हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये तरुणाने त्याच्यासोबत घडलेला सगळा प्रसंग सांगितला आहे. त्याने त्यांचं लग्न कसं झालं हे सविस्तर सांगितलं आहे. तरुणाने म्हटलं आहे की, लग्नाच्या 8 महिन्यापासून त्यांच्यात बोलणं होत होते. तेव्हा दोघांनीही खूप चांगला वेळ घालवला. दोघंही त्यांचे नाते समजुन घेत होते. तरुणीने लग्नाच्या आधी शारिरीक संबंध न ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तरुणीने तिच्या इच्छेचा पूर्ण मान ठेवला.

दोघांच्या लग्नानंतर त्यांच्यातील खरे नाते समोर आले. लग्न झाल्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा एकत्र आले तेव्हा पत्नीने तिच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला. तिने खुलासा केला की, तिला तो अजिबात आवडत नाही. आई-वडिलांच्या दबावापोटी तिने त्याच्याशी लग्न केले. पत्नीने पुढे म्हटले की, तिच्या कुटुंबीयांनी तिला धमकी दिली होती. त्याच्याशी लग्न केले नाही तर ते स्वतःचं काहीतरी बरं वाइट करुन घेतील. म्हणून ती शांत राहिली आणि त्याच्याशी लग्नाला तयार झाली.

इतकंच नव्हे तर, लग्नाच्या पहिल्या रात्री तिने पतीशी बोलताना म्हटलं की, जर त्याला जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवू शकतो. मात्र तरुणाने हे ऐकून माघार घेतली. या घटनेनंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर जेव्हा एका युजरने विचारलं की हे संपूर्ण प्रकरण सोडवण्यासाठी आणि घटस्फोट घेण्यासाठी किती वेळ लागला आणि किती पैसे खर्च केले. तेव्हा तरुणाने म्हटलं की, या सर्व प्रक्रियेसाठी त्याला दोन वर्ष लागले. याव्यतिरित्त कायदेशीर प्रक्रिया आणि पोटगीसाठी त्याला तब्बल 10 लाख रुपये खर्च करावे लागले.

या बातमीचा मुख्य स्रोत @fintech_shark यांनी X वर पोस्ट केलेला एक व्हायरल पोस्ट आणि रेडिट थ्रेड आहे. या बातमीमुळे ऑनलाइन चर्चा सुरू झाली आहे. अनेक यजर्सनी पुरुषांच्या हक्कांवर आणि भारतीय कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका युजरने लिहिले की, “दोन वर्षे वाया गेली आहेत आणि 10 लाख रुपये गमावले आहेत. आता, अशा पुरुषांना भारतात पुनर्विवाह करणे खूप कठीण झाले आहे.” काही वापरकर्त्यांनी असा युक्तिवादही केला की, शारीरिक संबंध नसल्यामुळे घटस्फोटाऐवजी विवाह रद्द करण्याचा विचार केला जाऊ शकला असता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *