ट्रक – बस भीषण अपघातात २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील  बरेली  येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात २० पेक्षा जास्त प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

बस गोंडा जिल्ह्याच्या दिशेने जात होती. यावेळी बस आणि ट्रकची जोरदार टक्कर झाली. यानंतर पेट्रोल टँक फुटल्याने दोन्ही वाहनांनी लगेचच पेट घेतला. या आगीत बसमधील २२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर १५ प्रवाशी जखमी झालेत.

घटनास्थळी अग्निशामन दलाची गाडी लगेचच दाखल झाली.  मात्र, आग इतकी भीषण होती की ती विझवण्यास उशीर झाला आणि बसचा कोळसा झाला. अपघातग्रस्त बस राज्य परिवहन मंडळाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *