रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज नागपूर दौऱ्यावर

नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या आणि विकासकामांची भेट देण्यासाठी आज रेल्वेमंत्री सुरेस प्रभू नागपूरात दाखल होणार आहेत.

रेल्वे मंत्र्यांच्या आगमनानिमित्त नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.

नविन रेल्वे गाड्यांसह विविध विकासकामांचा शुभारंभ यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमनिमित्ताने शहरात कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *