निवासी डॉक्टरांचा बेमुदत बंदचा इशारा

निवासी डॉक्टरांचा बेमुदत बंदचा इशारा

देशभरात आज, बुधवारी ‘डॉक्टर्स डे’ साजरा होत असतानाच, राज्यातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांनी उद्या, गुरुवारी २ जुलैपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. अपुरा पगार, कामाचे जादा तास, आजारपणाची रजा, सुरक्षा व्यवस्था या मुद्द्यांवरून हा संपाचा इशारा दिला असून, राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ आली आहे, असा दावा ‘मार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे.

राज्यातील सर्व निवासी डॉक्टर आज, बुधवारी काळ्या फ‌तिी लावून काम करतील. गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून राज्यातील १७ मेडिकल कॉलेजांतील निवासी डॉक्टर कामावर हजर होणार नाहीत, असे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे ‘मार्ड’च्या बैठका झाल्या. मागण्या पूर्ण करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. पण, त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा दावा ‘मार्ड’ने केला. इंडियन मेडिकल कौन्स‌लिचा संपाला पाठिंबा असून, मुंबई पालिकेच्या हॉस्पिटलांसह राज्यातील मेडिकल कॉलेजांमधील निवासी डॉक्टर संपात सहभागी होणार असल्याने २ जुलैपासून पेशंटचे हाल होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *