लवकरच दिसणार शाहिदच्या मीराची ‘झलक’!

बॉलीवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर जुलैच्या पहिल्या आठवड्यात बोहल्यावर चढणार असल्याची बातमी यापूर्वीच आली होती. मात्र, त्याच्या लग्नाची तारीख, ठिकाण आणि इतर माहिती इतके दिवस गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. अखेर बुधवारी शाहिदच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका शेअर करण्यात आली आहे. येत्या ७ जुलैला शाहिदचा विवाह सोहळा पार पडणार आहे. शाहिदची लग्न पत्रिका आकर्षणाचा विषय ठरत आहे. एव्हाना शाहिद आणि मीराच्या घरी  मित्र मंडळी येण्यास सुरूवात झाली असेलही. अतिशय आकर्षक पद्धतीने शाहिद-मीराच्या लग्नाच्या पत्रिकेचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. गुडगाव येथील ऑबोरॉय हॉटेलमध्ये ७ जुलै रोजी मोजके मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत शाहिद विवाह बंधनात अडकणार आहे. त्यानंतर १२ जुलै रोजी मुंबईत भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *