उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक अजबच घटना घडली आहे. कुत्र्याने केवळ चुकीच्या ठिकाणी लघुशंका केल्यामुळे दोन गटात प्रचंड हाणामारी झाली. हा वाद इतका पेटला की दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार गोळीबार केला. त्यात ४ जण जखमी झाले असून या जखमींवर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पूरनलाल नावाच्या एका व्यक्तीची स्कुटी बजारिया येथील अन्नपूर्णा मंदिराबाहेर उभी होती. इतक्यात मुन्ना यादव नावाच्या एका कुत्र्याने या स्कुटीवर जाऊन लघुशंका केली. त्यावर पुरनलाल चांगलाच भडकला. त्याने त्यावर आक्षेप घेत वाद घालायला सुरूवात केली. वादाचं पर्यावसान हाणामारीत झालं. मुन्ना आणि त्याच्या मुलाने रागाच्या भरात गोळीबार सुरू केला. त्यात पूरनलाल, त्याचा मुलगा विजय कुमार, मुकेश कुमार आणि रामकिशोर शर्मा नावाचा एक इसम या गोळीबारात जखमी झाला. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखळ करण्यात आले. एका जखमींची प्रकृती गंभीर आहे. आरोपी फरार असून त्यांचा तपास पोलीस करत आहेत.
