भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली कायम चर्चेत असतो. विराट कोहली मैदानात असो वा मैदानाबाहेर कायम त्याची नेहमीच चर्चा होत असते. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला फारशी चांगली कामगिरी करताना आलेली नाही. बंगळुरु संघाचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले. विराट कोहलीला यंदाच्या आयपीएलमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मात्र मैदानाबाहेरील आयुष्यामुळे सध्या विराट चर्चेत आहे. विराटने आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमातून गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासाठी वेळ काढल्याचे वृत्त आहे.
अभिनेत्री आणि विराट कोहलीची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माचा १ मे रोजी २९ वा वाढदिवस होता. यावेळी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली मुंबई विमानतळावर दिसले. अनुष्काच्या वाढदिवसाला विराटने अनुष्काला प्रपोज केल्याचीदेखील चर्चा आहे. मात्र नेमके असे खरेच घडले आहे की नाही, याबद्दल अनुष्का आणि विराटने काहीही भाष्य केलेले नाही.
विराट आणि अनुष्का या सेलिब्रिटी कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीने अनुष्कासोबत वेळ घालवला. आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकातून विराट कोहलीने खास अनुष्काच्या वाढदिवसासाठी वेळ काढला होता.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत आहेत. मागील वर्षी झालेल्या आयसीसी वर्ल्ड टी२० नंतर विराट आणि अनुष्काचे ब्रेक अप झाल्याची चर्चा होती. मात्र मागील वर्षी डिसेंबरमध्ये क्रिकेटपटू युवराज सिंगच्या लग्नात विराट आणि अनुष्का सोबत दिसले होते. यानंतर विराट आणि अनुष्का अनेकदा सोबत दिसले. अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त मुंबई विमानतळावर दिसण्याआधी विराटच्या खांद्याला दुखापत झाली असताना, अनुष्काला त्याला भेटण्यासाठी बंगळुरुला आली होती.
