धोनी-विराटमध्ये मतभेद नाहीत

धोनी-विराटमध्ये मतभेद नाहीत

भारताचे स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यातील मतभेदाच्या वृत्ताचे रवी शास्त्री यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले, या दोघांमध्ये कोणतेच मतभेद नाहीत. अशा प्रकारचे वृत्त म्हणजे मोठे ‘बकवास’ आहे. भारतीय संघाचे संचालक असलेल्या शास्त्री यांनी दोन्ही खेळाडू एकमेकांचा आदर करीत असल्याचे स्पष्ट केले. शास्त्री म्हणाले, विराट हा युवा तसेच उत्साही खेळाडू आहे. तो बऱ्याच गोष्टी शिकत आहे. तो सध्या २६ वर्षांचा आहे. त्याला एक-दोन वर्ष तरी कर्णधारपद सांभाळू द्या. त्याचे धोनीसोबत चांगले संबध आहेत. या दोघांमध्ये दुरावा नाही. ते दोघेही एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि म्हणून आम्ही आतापर्यंत ७० टक्के सामने जिंकले आहेत. धोनी हा ‘लिजंंड’ असून तो आपल्या शर्तीवरच खेळत असतो. ज्या पद्धतीने त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, ते एक सर्वात मोठे उदाहरण आहे. बरेच खेळाडू १०० कसोटीच खेळतात.

युवा खेळाडूंना वेळ द्या…

अजिंक्य राहणे, शिखर धवन, रोहित शर्मा या युवा खेळाडूंना थोडा वेळ द्यायला हवा. त्यांचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन अजून बाकी आहे. हे सर्व खेळाडू २६ ते २८ वर्षांच्या आत आहेत. या खेळाडूंच्या आकडेवारीवर जाऊ नका. या खेळाडूंची शैली मला खूप आवडते. प्रतिस्पर्ध्यांचा ते मोठ्या हिमतीने सामना करतात. त्यांच्या खेळात आक्रमकता आहे. ही फार महत्त्वाची असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *