महिलांच्या सक्षमीकरणासाठी खास निर्माण करण्यात आलेल्या नवख्या भारतीय महिला बँकेचे देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याबाबत अर्थखात्याकडून विचार सुरू आहे. सध्या केवळ विचार सुरू आहे, यावर निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
याबाबत एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्याशी विचारणा केली असता या बातमीचा नेमका स्रेत काय याबाबत आपल्याला माहिती नाही. यासंदर्भात आपल्याशी कोणीच संपर्क साधला नसून मंत्रिमंडळात जी चर्चा होते त्यातून हे बाहेर आले असावे, असे त्या म्हणाल्या. त्याच वेळी महिला बँकेला सामावून घेण्यात एसबीआयला कोणतीही अडचण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

