गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याने स्वत:ला मारली गोळी

एका तरुणाने गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप  झाला म्हणून स्वत:ला गोळी मारुन घेतली. दोघांमध्ये ब्रेकअप झाला. दोघांचे मित्र मध्यस्थी करुन वाद संपवण्याचा प्रयत्न करतात. उशिरा रात्रीपर्यंत ते चालतं सकाळ होऊन जाते पण रस्ता काही निघत नाही. तेव्हा मुलगा आपल्या जवळची बंदुक काढतो आणि स्वत:ला गोळी मारतो.

छत्तीसगढमधील रायपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही मित्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही. रोहितच्या चारही मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. हे नेमकं प्रेम प्रकरण होतं की अजून काही वेगळी गोष्ट होती याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *