शेतकऱ्याची आत्महत्या; पत्नीनेही २ लेकरांसह घेतले विष

घरात अठरा विश्व दारिद्र्य आणि त्यात जडलेला पोटाचा आजार यामुळे कंटाळलेल्या पतीने जीवन संपवले. पतीच्या आत्महत्येची बातमी कळताच पत्नीचा जगण्याचा धीर खचला आणि पत्नीनेही पोटच्या दोन मुलांसह स्वतःही विष प्राशन केले. यामध्ये ३ महिन्यांच्या चिमुरडीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर माय लेकाचा मृत्यू सोबतचा लढा सुरु आहे. बीड जिल्ह्यातील होळ येथे मनाला चटका लावणारी ही घटना घडली.
होळ येथील पांडुरंग आश्रूबा घुगे (२७) या अल्पभूदारक शेतकऱ्याने गरिबीला कंटाळून जीवनाचा दोर कापला. पतीने साथ सोडल्याचे कळल्यानंतर निराश झालेल्या पत्नीने पोटच्या दोन गोळ्यांना विष पाजत स्वतःही विष प्राशन केले.
या घटनेत मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर आई आणि चार वर्षांच्या आदित्य पांडुरंग घुगे या मुलाची मृत्यूशी झुंज सुरु आहे. अंबेजोगाई येथील स्वराती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *