आम आदमी केजरीवालांचं दोन महिन्याचं वीज बिल 91 हजार रुपये!

आम आदमी  केजरीवालांचं दोन महिन्याचं वीज बिल 91 हजार रुपये!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवल यांच्या घराचं वीज बिल तब्बल 91 हजार रुपये एवढं आलं आहे. विशेष म्हणजे हे बील केवळ एप्रिल आणि मे महिन्याचेच आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.

वकील आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक गर्ग यांनी माहिती अधिकाराअंतर्गत अर्जाद्वारे ही माहिती मागवली होती. त्यावर सामान्य प्रशासन विभागाने केजरीवालांच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील घराच्या वीज बिलाची माहिती गर्ग यांच्या अर्जावर उत्तरादाखल दिली आहे.

दरम्यान, दिल्ली भाजपने केजरीवालांसह आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली आहे. शिवाय ‘आप’च्या इतर नेत्यांचे वीज बिलही जाहीर करण्यची मागणी दिल्ली भाजपने केली आहे.

दिल्ली भाजप प्रवक्ते प्रवीण कपूर यांनी आरोप केला आहे की, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी विजेचे दोन मिटर आहेत. दोन्ही मिटरचे आताचे बिल 55 हजार रुपये आणि 48 हजार रुपये म्हणजे एकूम 1 लाख 3 हजार रुपये आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *