मॅगीला परदेशात निर्यात करण्यावर मुंबई हायकोर्टाने परवनागी दिली आहे. त्यामुळे नेस्ले इंडिया कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. मॅगीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.
मॅगीवर बंदी आणल्यानतंर नेस्ले इंडियाना मॅगीच्या कोट्यवधींच्या मालाचं नुकसान टाळण्यासाठी हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी झाली.
या सुनावणीगदरम्यान राज्य सरकारनेही मॅगीवर आपली भूमिका स्पष्ट केली. जर मॅगीला एवढा मोठा माल नष्ट केल्यास नुकसानाला समोरं जावं लागत असेल, तर त्यांनी माल परदेशात निर्यात करावा, असे राज्य सरकारने स्पष्ट केले.
दरम्यान, मॅगीसंदर्भात पुढील सुनावणी 14 जुलैला मुंबई हायकोर्टात होणार आहे.

