विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानीकारक ठरणाऱ्या चायनीज भेळला महापालिका शाळेबाहेर विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा ठराव मुंबई महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे.
मुंबईत महापालिका शाळांबाहेर सर्रासपणे चायनीज भेळची विक्री करण्यात येते. या भेळमध्ये अजिनोमोटो मोठ्या प्रमाणात टाकण्यात येतो. ते आरोग्याला घातक आहे. त्यामुळे चायनीज भेळच्या गाड्यांवर बंदी घालण्यात यावी या प्रस्तावाला महासभेत मंजुरी मिळाली.
नुकतचं महापालिकेने रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच सर्वेक्षण केलं .ज्यात ई-कोलाय नावाचा विषारी बॅक्टेरीया सापडला होता.त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने शाळांबाहेरच्या चायनिज भेळवरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

