‘जिओ’च्या सेट टॉप बॉक्ससोबत ब्रॉडबँडही येणार!

रिलायन्स जिओची समर सरप्राईज ऑफर ट्रायच्या आदेशानंतर मागे घेण्यात आली… पण, लवकरच जिओकडून नवं सरप्राईज मिळण्याची शक्यता दिसतेय.

मोबाईल इंटरनेटसोबत जिओ आता सेट टॉप बॉक्स आणि ब्रॉडबँड सेवाही उपलब्ध करून देणार आहे. लवकरच याची घोषणा होऊ शकते. रिलायन्स जिओच्या वेबसाईट रिचार्ज सेक्शनमध्ये पहिल्यांदाच ब्रॉडबॅन्ड आणि डीटीएच सर्व्हिसचाही उल्लेख आहे.

जिओ ब्रॉडबॅन्ड सर्व्हिससाठी जिओ फायबरला देशातील अनेक शहरांमध्ये टेस्ट करू शकतं. ब्रॉडबॅन्डशिवाय डीटीएच मार्केटमध्येही जिओ एन्ट्री घेऊ शकतं. मिळालेल्या माहितीनुसार, जिओ सेट-टॉप बॉक्समध्ये ३६० हून अधिक चॅनल्स ऑफर केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *