पाकिस्तानात मनोरुग्णाकडून दग्यार्तील २० जणांना कंठस्नान

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका दर्ग्यात २० व्यक्तिंची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील सहा जण प्राणाला मुकले आहेत. भाविकांमधील तीनजणांची स्थिती गंभीर असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दर्ग्यावर ताबा मिळवण्यापूर्वी केअरटेकर्सच्या दोन गटात वाद झाला होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसाना मिळाली असून याप्रकरणी दर्ग्याची देखभाल करणाया व्यक्तिसहीत अन्य पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचेही सांगितले जात आहे.पंजाब प्रांतामधील सरोगधा जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.

पाप धुण्यासाठी भाविक दर्ग्यात येत असतात. या दरम्यान ते केअरटेकर्सना स्वत:ला मारहाण करण्याची परवानगी देतात. मात्र, या प्रकरणामध्ये भाविकांना आधी नशेचे द्रव्य पाजले गेले आणि नंतर सुरा खूपसून दंडुक्याने त्यांना मारहाण केली गेली असावी, असे स्पष्ट होत आहे. मोहमंद अली गुज्जर यांचा हा दर्गा लाहोरपासून २०० किमी दुर सरोगधातील चक-९५ गावात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *