जिओ मोबाईल धारकांसाठी एक आनंदाची बातमी

जिओ मोबाईल धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ प्राइम मेंबरशिपची मुदत आणखी १५ दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. आता जिओच्या ग्राहकांना १५ एप्रिलपर्यंत जिओच्या प्राइम मेंबरशिपसाठी नोंदणी करता येईल.

कंपनीने प्राइम मेंबर्ससाठी जिओ समर सरप्राईज ऑफर आणली आहे. यामध्ये १५ एप्रिलपूर्वी ३०३ रुपयांचा प्लान घेणा-या ग्राहकांना तीन महिने मोफत सेवा मिळणार आहे.

एका महिन्यात ७ कोटी २० लाख लोकांनी जिओ प्राइमसाठी नोंदणी केली आहे. आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय त्याने आम्ही भारावून गेलोय. मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ ग्राहकांसाठी लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

२१ फेब्रुवारीला अंबानी यांनी प्राइम मेंबरशिपची योजना जाहीर केली. या योजनेमध्ये ९९ रुपये भरुन तुम्हाला प्राइम मेंबरशिप मिळते. ही योजना वर्षभरासाठी लागू राहिल. प्राइम मेंबरशिपच नव्हे १४९ रुपयांपासून कंपनीने वेगवेगळया ऑफर्स आणल्या आहेत.

प्राइम मेंबरशिप घेतल्यास जुलैपासून महिन्याला ३०३ रुपये मोजावे लागतील. यामध्ये २८ जीबी ४जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. मुदत वाढवल्यामुळे ज्या ग्राहकांना काही कारणामुळे नोंदणी करता आलेली नाही त्यांची सेवा खंडीत होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *