मुंबईतील परळ स्थानकाला उडवण्याची धमकी मिळाली आहे. परळ स्थानकाला संध्याकाळी ५ वाजता उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर स्थानकावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
न्यूज२४ या हिंदी साईटने दिलेल्या बातमीनुसार रेल्वे पोलीस, एटीएस आणि लोकल पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. डॉग स्कॉड रेल्वे स्थानकात सर्च ऑपरेशन चालवत आहे.
शनिवारी ११.१५ मिनिटांनी एक अज्ञात व्यक्तीने फोन करुन परळ स्थानक उडवणार असल्याची माहिती दिली होती. कोलकातावरुन २ जण येऊन स्थानकाला बॉम्बने उडवणार असल्याची माहिती रेल्वे कंट्रोल रुमला देण्यात आली होती.