मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी सकाळीच ट्राफिक जाम झालंय.
बोरघाटात सकाळी 8.45 वाजता एक कंटेनर उलटून अपघात झालाय. कंटेनर रस्त्यातच उलटल्यानं त्याचा परिणाम वाहतुकीवर झालाय.
मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लेन पैंकी दोन लेन बंद करण्यात आलीय. केवळ एका लेननं वाहतूक सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबलेली दिसतेय.
