महिलांना मोफत कुस्ती प्रशिक्षण मिळणार

महिला दिनाच्या निमित्ताने मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने महिलांना मोफत कुस्ती प्रशिक्षणाचे धडे देण्यात येणार आहे. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात कुस्ती प्रशिक्षण पार पडेल. सध्या देशात कुस्तीला पोषक वातावरण असल्यामुळे महिलांना त्याचा लाभ घेता येण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

राज्य स्तरावर महिला कुस्तीपटू तयार करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे. हे प्रशिक्षण केंद्र ८ मार्च पासून रोज सायंकाळी ४.३० ते ६ वाजे पर्यंत रविवार वगळता सुरु राहणार आहे. महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांनी प्रवेशासाठी भारतीय क्रीडा मंदिरात गजानन फोंडसे यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *