अकलापूरमध्ये दत्त मंदिराचा कळस चोरीला, भाविकांमध्ये संताप

संगमनेर तालुक्यातील अकलापूरमध्ये दत्त मंदिराचा कळसाचा वरचा भाग चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने भाविकांमध्ये संताप पसरला असून भाविकांनी मंदिराजवळ गर्दी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

अकलापूरमध्ये झाडगाव येथे दत्तमंदिर असून ग्रामस्थांमध्ये हे मंदिर प्रसिद्ध आहे. सोमवारी रात्री अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिराच्या कळसाचा वरचा भाग चोरला. या कळसाठी सुमारे ५० तोळे सोने वापरण्यात आले होते. यातील २० तोळे सोने चोरीला गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी ग्रामस्थांना मंदिराच्या कळसाचा काही भाग चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. चोरीचे वृत्त समजताच मंदिराजवळ ग्रामस्थांची गर्दी झाली. चोरीच्या या घटनेवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *