लग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड

नाशकात लग्नातून वधूचे दागिने चोरणारा ‘बंटी’ गजाआड करण्यात आला आहे. लग्न  सोहळा सुरु असताना मंगल कार्यालयातून वधूचे या चोराने लांबवले होते.  नाशकातील म्हसरुळ पोलिसांनी आरोपी राजेंद्र जाधवला बेड्या ठोकल्या.

नाशिकमधील मेरी रोडवर असलेल्या  औदुंबर लॉन्समध्ये १  मार्च २०१७ रोजी विवाहसोहळा होता. लग्नाच्या दिवशी वधूच्या बॅगमधून १  लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली.

औदुंबर लॉन्स मधील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु असताना भद्रकाली परिसरातून राजेंद्र जाधवला पोलिसांनी केली अटक केली. आरोपीने २०१४  साली अशाच प्रकारे पंचवटी परिसरात चोरी केल्याचीही माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *