कॉमेडी स्टार कपिल शर्माचा नेत्रदानाचा निर्णय

कॉमेडी किंग कपिल शर्माने नेत्रदान  करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मृत्यूनंतर शरीराचा एक छोटासा अवयवही खूप काही करु शकतो, याची कल्पनाही आपल्याला नसते, असं कपिल म्हणाला.

दृष्टीहीनांच्या क्रिकेट संघासोबतच्या कार्यक्रमानंतर मी नेत्रदानाचा निर्णय घेतला. माझ्यानंतरही कुणी माझ्या डोळ्यांनी पाहू शकत असेल, तर त्याचा आनंद होईल, असं कपिल म्हणाला.

कपिलने त्याच्या शोमध्ये भारताच्या दृष्टीहीन क्रिकेट संघाला निमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमानंतर त्याने नेत्रदान करण्याचं घोषित केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *