वीज ग्राहकांना विद्युत नियामक आयोगाचा दिलासा, १ जूनपासून वीज दरात कपात

वीज ग्राहकांना विद्युत नियामक आयोगाचा दिलासा,  १ जूनपासून वीज दरात कपात

राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने  राज्यातील विजपुरवठा कंपन्यांना आपल्या वीज दरांमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.

1 जून पासून राज्यात हे सुधारित दर लागून होणार आहेत. आयोगाने दिलेल्या आदेशानुसार महावितरणच्या सरासरी वीज दरात आता 5.75 टक्क्यांची कपात करण्याचे आदेश दिले आहेत. तर उद्योगधंद्यांसाठीच्या वीजदरातही 7 ते 10 टक्क्यांनी कपात करण्याचा आदेश आयोगाने दिला आहे.

रेल्वेसाठी देण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यातही तब्बल 10 टक्क्यांनी कपात होणार आहे. याचसोबत शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांसाठीही वीज दरांची नवीन उप-वर्गवारी तयार करण्यात येणार आहे. याचसोबत ज्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला मीटरसह जोडणी असेल अशा कृषी पंपांच्या वीजदरातही आता सवलत मिळणार आहे. त्यामुळे सामान्य वीजग्राहकांना याचा नक्कीच फायदा होईल यात काही शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *