ट्युनिशियामध्ये दहशतवादी हल्ल्यात २७ ठार

ट्युनिशियामध्ये दहशतवादी हल्ल्यात २७ ठार

उत्तर आफ्रिकेतील ट्युनिशियामध्ये सूजे शहरामधील इंपिरियल महराबा या टुरिस्ट हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

एका दहशतवाद्याने या हॉटेलमधील पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. मृतांमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

यावेळी एका हल्लेखोराला ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरा हल्लेखोर तेथून पळाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

टय़ुनिसपासून १४० किलोमीटर सौसे जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये कलिनिशकोव्ह रायफलने गोळीबार केला. यात २७ जण ठार झाल्याचे अंतर्गत सुरक्षा खात्याचे प्रवक्ते मोहम्मद अली अरोरी यांनी सांगितले. या हल्ल्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले असून यात हल्लेखोर मारला गेला आहे.

सूजे हे ट्युनिशियामधील सुप्रसिद्ध बीच असून येथे युरोप आणि शेजारच्या देशातील अनेक पर्यटक भेट देत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *