एटीएममध्ये गोळीबार

एटीएममध्ये गोळीबार

एटीएममध्ये गोळीबार करुन तरुणीला लुटल्याची घटना आज हैदराबादमधील युसूफगुडा परिसरात घडली. तरुणीच्या गळ्यातील सोन्याची चैन, कानातले, एटीएम कार्ड लुटून चोर बाईकवरुन पसार झाला.

श्रीलता असं या 24 वर्षीय तरुणीचं नाव आहे. एटीएमममधून पैसे काढून निघताना चोर जबरदस्तीने एटीएम रुममध्ये घुसला आणि तिच्याकडे पैशांची मागणी केली. परंतु तिने पैसै देण्यास नकार दिल्याने त्याने बंदूक काढली आणि भिंतीवर गोळीबार केला.

यानंतर घाबरलेल्या तरुणीने तिचा एटीएम पिननंबर त्याच्याशी शेअर केला आणि महिलेचे दागिने, पैसे आणि कार्ड लुटल्यानंतर चोर पसार झाला. यानंतर महिलेल्या तिच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज आला की अकाऊंटमधून 2500 रुपये काढण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *