जपानी टेलिकम्युनिकेशन कंपनी सॉफ्टबँकेचे भारतीय वंशाचे नवनियुक्त अध्यक्ष निकेश अरोरा यांना महिन्याला १२१ कोटी ५० लाख रुपये वेतन आहे. यानुसार निकेश दिवसाला ४ कोटी रुपये वेतन घेत आहेत. सप्टेंबर ते मार्च २०१५पर्यंत सॉफ्टबँकेने त्यांना ८५०.५ कोटी रुपये (१६.५५५ अब्ज येन) वेतनापोटी दिले आहेत. निकेश अरोरा यांनी आयआयटी-वाराणसी(बनारस हिंदू युनिव्हर्सिटी)तून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
गुगलचे कार्यकारी अधिकारी राहिलेले ४७ वर्षीय अरोरा हे सॉफ्टबँकेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गेल्या शुक्रवारी झालेल्या शेअरधारकांच्या बैठकीत त्यांची कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य परिचालन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सॉफ्टबँकेत रुजू झाले होते. एका वर्षात १०,७०० कोटींचा व्यवसाय मिळवून दिल्यानेच त्यांना मोठय़ा वेतनाचे हक्कदार होता आले आहे.

