यंदा मान्सून रूसणार? कमी पावसाची शक्यता

यंदा मान्सूनचा परिणाम कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी सध्या अस्तित्वात असलेल्या हवामान प्रतिमानाच्या आधारे यंदा अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यंदा अल निनोचा मान्सूनवर परिणाम होईल. त्याचबरोबर दिल्लीतही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या हवामानाच्या प्रतिमानानुसार यंदा अल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये साधारण परिस्थितीहून कमी पाऊस पडू शकतो. मान्सूनबाबत मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये आणखी विस्तृत माहिती मिळण्याची शक्यता आहे. परंतु आत्ताच्या परिस्थितीनुसार जून-जुलैच्या आसपास मान्सूनमध्ये जास्त हालचाली दिसणार नाहीत. परंतु, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी राहण्याचे संकेत मिळाले आहेत

 
 डियन ओशन डायपोल (आयओडी) पॉझिटिव्ह राहिल्यास साधारण परिस्थितीच्या आसपास पाऊस पडू शकतो. हा अल निनोचा परिणाम कमी करून मान्सूनला सक्रिय करतो. आयओडीमध्ये अरबी समुद्र आणि हिंदी महासागरच्या समुद्राच्या स्थितीबाबत माहिती मिळते. जेव्हा अरबी सागर आणि हिंदी महासागराच्या समुद्र सपाटीच्या तापमानात वाढ होते. तेव्हा त्याचे ढग बनतात आणि पाऊस पडण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे मान्सूनही सक्रिय होतो. आयओडीमुळेच दक्षिण भारताकडे मान्सून सरकतो. अल निनोमुळे मान्सून कमजोर होतो. परंतु, आयओडीमुळे याचा परिणाम कमी होण्यास मदत होते.
प्रशांत महासागरमध्ये पूर्व प्रशांत महासागरच्या समुद्र सपाटीच्या तापमान जेव्हा वाढ होते. तेव्हा याचा वारा प्रशांत महासागरकडे सरकतो. तिकडे दक्षिण प्रशांत महासागर थंड होतो. त्यामुळे पाऊस कमी पडतो आणि अल निनोचा परिणाम दिसून येतो. दक्षिण प्रशांत महासागर हा मलेशियाकडे येतो. येथे थंडी असल्यामुळे मान्सून कमजोर होतो. हवामानाच्या संपूर्ण प्रक्रियेवर अल निनोचा परिणाम दिसून येतो.
पलावत म्हणाले, यंदा दिल्लीमध्ये कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये दोन वर्षांपूर्वी (२०१५ मध्ये) खूप चांगला पाऊस झाला होता. तेव्हा दिल्लीमध्ये १०० मिमी पाऊस पडला होता. मात्र यंदा मार्चमध्ये पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *