ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांच सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हॉलिवूडच्या ‘लायन द किंग’ सिनेमातील बालकलाकार सनी पवार आज मुंबईत परतला आहे. मुंबई विमानतळावर सनी पवारच्या कुटुंबिय आणि मित्रांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं. ऑस्कर पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत ‘लायन’ चित्रपटही होता. सोशल मीडियावरही सगळीकडेच या चित्रपटाची चर्चा सुरु होती. मात्र या चर्चेमागचं मुख्य कारण होता तो म्हणजे सनी पवार. तर दुसरीकडे चित्रपटासाठी भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल यालासुद्धा ऑस्करसाठीचे नामांकन मिळाले होते.
लायन’च्या निमित्ताने देवसोबतच आणखी एक चेहरा चर्चेत आला तो म्हणजे सनी पवार. सनीने या सिनेमात देव पटेलच्या बालपणाची व्यक्तीरेखा साकारली आहे.गोल्डन ग्लोब आणि इतर पुरस्कार सोहळ्यांमध्येही सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. सनी हा मुंबईतल्या कलिना परिसरातील एका लहानशा घरात राहतो. मात्र त्याचं हे यश पाहून त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
