महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 141वी जयंती आहे. या निमित्ताने कोल्हापुरासह राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
राजर्षी शाहू महाराज यांची जयंती हा दिवस राज्यात ‘सामाजिक न्यायदिन’ म्हणून साजरा केला जातो. गोरगरीब, आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती, जमातीतल्या नागरिकांसाठी सामाजिक योजना राबवून त्यांनी सर्वांना न्याय देण्याचे कार्य केलं.

