पदवी बनावट असू शकते, इराणी नाही – लालू

पदवी बनावट असू शकते, इराणी नाही – लालू

निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी वादात अडकलेल्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकाडून केली जात असताना राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांनी मात्र इराणींना पाठिंबा दर्शविला आहे.

इराणी यांची पदवी बनावट असू शकते मात्र त्या तशा नाहीत असे लालू प्रसाद यांनी सांगितले.

पदवीशी आपल्याला काय करायचे आहे? इराणी ख-या आहेत. त्या एक महिला आहे. क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेत त्यांनी काम केले आहे. त्या माझा खूप आदर करतात असे प्रसाद म्हणाले.

निवजूक प्रतिज्ञापत्रात चुकीची शैक्षणिक माहिती दिल्याचा आरोप इराणी यांच्यावर आहे. याप्रकरणी खटला चालवण्याचा निर्णयही २४ जून रोजी न्यायालयाने दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *