कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली

कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली

पुणे-सातारा महामार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली असून त्यामध्ये एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली.

खंडाळ्यातील दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी दुपारी नवीन कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली. सुदैवाने दरड रस्त्याच्या बाजूला कोसळली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

या घटनेमुळे या मार्गावरून जाणा-या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून वाहतूक सुरळीत चालू होती, असे कात्रज वाहतूक विभागातर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *