अलिबाग किनारी 42 फुटी अजस्त्र मासा, 2 हजार किलो वजनी व्हेलचा मृत्यू

अलिबाग किनारी 42 फुटी अजस्त्र मासा, 2 हजार किलो वजनी व्हेलचा मृत्यू

अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर आढळून आलेल्या 42 फुटी व्हेल माशाचा अखेर मृत्यू झाला आहे.  अलिबाग तालुक्याच्या रेवदंडा समुद्रकिनारी काल दुपारी हा मासा आढळून आला होता. या माशाची लांबी तब्बल 42 फूट तर वजन 2 हजार किलो इतकं आहे.

काल समुद्रकिनारी हा मासा आढळून आल्यानंतर त्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. यानंतर त्याला खोल समुद्रात नेण्याचेही प्रयत्न सुरु झाले. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास या माशाला समुद्रात सोडण्याचे प्रयत्न करण्यात आले. स्थानिक गावकरी, जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हे प्रयत्न सुरु होते. मात्र आज पहाटे चारच्या सुमारास या माशाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

आज सकाळी हा प्रचंड मोठा मासा समुद्रकिनारी वाहत आला. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी पुन्हा गर्दी केली होती.

सध्या या माशाचे विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परिसरात दुर्गंधी पसरू नये, यासाठी मोठा खड्डा खणून त्याला पुरण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *