विधानभवन इमारतीवरुन पडून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

विधानभवन इमारतीवरुन पडून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

विधानभवनाच्या दुसऱ्या मजल्यावरुन अग्निशमन दलाचा एक कर्मचारी पडून त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. या घटनेमुळे विधानभवन परिसरात काही काळ खळबळ माजली होती.

मुंब्र्याचा रहिवाशी असणारा अर्जुन कचरे हा विधानभवनच्या अग्निशमन दलात कार्यरत होता. आज सकाळी त्याच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने अर्जुन निराश असल्याची माहिती समजते आहे. त्यामुळ अर्जुनने आत्महत्या केली की त्याचा अपघाती मृत्यू झाला? याविषयी अद्याप माहिती मिळेलेली नाही.

अर्जुन कचरेकडून कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट अद्याप तरी मिळालेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *