मुसळधार पावसामुळे गुजरात, जम्मू-काश्मीर राज्यात पूरजन्य परिस्थिती

मुसळधार पावसामुळे गुजरात, जम्मू-काश्मीर राज्यात पूरजन्य परिस्थिती

देशभरातील विविध राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे गुजरात, जम्मू-काश्मीर राज्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

गुजरातमध्ये मंगळवार-बुधवारी झालेल्या मुसळधार पाऊस, वादळामुळे तेथील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. गुजरातमध्ये ३४ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गुजरातमध्ये चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे.

काश्मीरमध्ये पूरजन्य परिस्थिती

गुजरातसह जम्मू-काश्मीर राज्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे तेथील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. कोसळत असलेल्या संततधारेमुळे काश्मीरमधील झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे अनंतनग आणि फुलवामा जिल्ह्यात हायअलर्ट जारी कऱण्यात आला. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार श्रीनगर आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये शनिवारपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्येही मुसळधार

राजस्थानच्याही अनेक राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारी मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबत पूर्व उत्तर प्रदेशाला बुधवारी जोरदार पावसाने झोडपले. पुढील काही दिवसांत संपूर्ण राज्यात दमदार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *