महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर कऱण्यात आली आहे.
तीन जूनला सकाळी ११ वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. तर ३० मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर १० जून पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून गुणपत्रिका दिली जाणार आहे. तर सहा जूननंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहे.
खालील वेबसाईटवरुन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.
www.mahresult.nic.in/
www.msbshes.ahc.in
www.sscresultmkcl.org
www.rediff.com/exams