लिनोव्हो ४ जीबी रॅम फोन काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक

लिनोव्हो ४ जीबी रॅम फोन काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक

लिनोव्हो ४ जीबी रॅम फोनसाठी फ्लिपकार्ट या वेबसाइटवर सेल झाला आणि बघता बघता या फोनच्या हजारो प्रती विकल्या गेल्या. सेल सुरू झाल्याच्या अवघ्या काही मिनिटांतच लिनोव्हो के ६ पावर ४ जीबी रॅम व्हेरियंट ऑऊट ऑफ स्टॉक झाला. गेल्या काही दिवसांपासून ४ जीबी रॅमच्या फोनची ‘क्रेझ’ भारतात वाढत आहे. नुकताच रेडमी नोट ४ चा सेल झाला. हा फोन देखील लवकरच आऊट ऑफ स्टॉक झाला.

लिनोव्होच्या के ६ पावर या फोनचे ३ जीबी रॅम हे व्हेरियंट नोव्हेंबरमध्ये लाँच करण्यात आले होते. तेव्हापासून ४ जीबी रॅम व्हेरियंट केव्हा लाँच होईल याबाबत उत्सुकता होती. ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटची इंटरनल मेमरी ३२ जीबी आहे. या फोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे या फोनची पावरफुल बॅटरी. ४,००० एमएमच ची बॅटरी या फोनला आहे. ९६.५ तासांचा म्युझिक प्लेबॅक, १३.६ तासांचा व्हिडिओ प्लेबॅक, ४८ तासांचे व्हॉइस कॉल, १२.६ तासांचे वेब सर्फिंग आणि ६४९ तासांचा स्टॅंडबाय टाइम ही या फोनच्या बॅटरीची वैशिष्ट्ये आहे. आणखी एक महत्त्वाचे फीचर म्हणजे या फोनला रिव्हर्स चार्जिंगची व्यवस्था आहे. त्यामुळे या फोनचा वापर तुम्ही पावर बॅंक सारखा देखील करू शकाल. या फोनला डॉल्बी अॅटमॉस ऑडियो इनहांसमेंटची सुविधा आहे. स्टिरिओ स्पीकर, थिएटर मॅक्स मिडिया कंझम्पशन सर्व्हिस आणि फिंगरप्रिंट सेंसर या सुविधा या फोनवर उपलब्ध आहेत.

फोनची वैशिष्ट्ये

सिम स्लॉट – ड्युएल सिम
ऑपरेटिंग सिस्टम – अॅंड्रॉइड ६.०, १.४ जीएच ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३० एसओएस
डिस्प्ले- ५ इंच फुल एचडी १०८०x१९२० पिक्सेल्स
कॅमेरा – १३ मेगापिक्सल, सोनी आयएमएक्स २५८ सेंसर, एलईडी फ्लॅश, ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, वाइड अॅंगल लेंस
कनेक्टिविटी- ४ जीएलटीई, वायफाय, ब्लूटूथ, एफएम रेडिओ, मायक्रो युएसबी, जीपीएस.
मेमरी कॅपेसिटी- ३२ जीबी इंटरनल मेमरी
किंमत – १०,९९९ रुपये
विक्रीसाठी उपलब्ध – ३१ जानेवारी २०१७, फ्लिपकार्ट
हा फोनला तज्ज्ञांची पसंती मिळाली आहे. अनेक तास व्हिडिओ गेम खेळून देखील या फोनची बॅटरी टिकून राहते. तसेच रिव्हर्स चार्जिंगमुळे तुमच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या फोनचेही चार्जिंग तुम्ही करू शकता हे या फोनचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *