घरटं बांधून राहणारा आगळावेगळा बेडूक, आंबोली परिसरात प्राणीप्रेमींची गर्दी

घरटं बांधून राहणारा आगळावेगळा बेडूक, आंबोली परिसरात प्राणीप्रेमींची गर्दी

पावसाच्या आगमनाबरोबरच दुर्मिळ मलबार ग्लायडिंग बेडूक आंबोली परिसरात आढळला आहे. या बेडकाचं वैशिष्टय म्हणजे हा बेडूक झाडावर घरटी बांधून अंडी घालतो.

थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण असलेला आंबोलीचा परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आणि आता प्राणीप्रेमी या दुर्मिळ मलबार ग्लायडिंग बेडूक पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.

जैवविविधतेनं नटलेल्य़ा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली परिसरात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आणि प्राणी आहेत. कोकणात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं वन्यप्राणी संशोधकही संशोधनासाठी आंबोली परिसरात येवू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *