महिलेला टाईट जीन्स घालणं महागात पडलं

महिलेला टाईट जीन्स घालणं महागात पडलं

ऑस्ट्रेलियातील एका महिलेला टाईट जीन्स घालणं महागात पडलं, यामुळे या महिलेला चार दिवस हॉ़स्पिटलमध्ये काढावे लागले.

ही महिला ३५ वर्षांची आहे, या महिलेने एवढी टाईट जीन्स घातली होती की, या महिलेच्या पायातील रक्ताभिसरण मंदावलं. यामुळे या महिलेचे पाय मोठ्या प्रमाणात सुजले, सुजल्यामुळे जीन्स आणखी टाईट झाली.

सुज वाढल्याने महिलेला चालता येत नव्हतं, आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं, या महिलेला पक्षाघाताचा झटका आला की काय असा संशय सुरूवातीला येत होता. या महिलेला चालता येत नव्हतं, त्यामुळे ही महिला एकदा खाली पडली. हा प्रकार रॉयल अॅडिलेड हॉस्पिटलचा आहे.

सुजल्याने पाय आणखी जाड झाले होते, या महिलेची स्थिती एवढी वाईट होती की तिच्या पायाची बोटंही हलवू शकत नव्हती, या महिलेची जीन्स कापून काढण्यात आली, यानंतर या महिलेला चार दिवस उपचार घ्यावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *