व्याहीबुवांमुळे सुपरस्टार रजनीकांत अडचणीत

व्याहीबुवांमुळे सुपरस्टार रजनीकांत अडचणीत

तमिळ चित्रपटांचा अनिभिषिक्त सम्राट रजनीकांतला मद्रास हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. एका निर्मात्याने केलेल्या याचिकेत रजनीकांत यांचे व्याही कस्तुरी राजा यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. कस्तुरी राजा हे रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या हिचा पती, अभिनेता धनुषचे वडील आहेत.

कस्तुरी राजा निर्माता मुकुंद बोत्रा यांच्याकडून उधारीवर घेतलेली रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यास रजनीकांत भरपाई करतील, असं लेखी आश्वासन खुद्द कस्तुरी राजा यांनीच दिल्याचा दावा बोत्रा यांनी केला आहे.

कस्तुरी राजा यांनी मैं हू रजनीकांत या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी 2012 मध्ये 40 लाख रुपये उधार घेतले होते. त्यानंतर पुन्हा 25 लाख रुपये घेताना कस्तुरी राजा यांनी लेखी आश्वासन दिल्याचं बोत्रा यांनी म्हटलं आहे.

बोत्रा यांच्या माहितीनुसार कस्तुरी राजा यांनी दिलेला चेकही बाऊन्स झाला होता. त्यानंतर न्यायमूर्तींनी रजनीकांतला नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांचा अॅनिमेटेड चित्रपट ‘कोचादेयान’च्या प्रोडक्शनदरम्यान दिलेले खोटे जबाब आणि चुकीचे दस्ताऐवजांचा वापर केल्याप्रकरणी काहीच दिवसांपूर्वी रजनीकांतच्या पत्नीवरही गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *