सेलिब्रिटी कपल शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे स्वामित्व हक्क असलेली होम शॉपिंग वाहिनी ‘बेस्ट डिल टीव्ही’चे भविष्य सध्या अंधारात असल्याचे चित्र आहे. शिल्पाचा नवरा राज कुंद्रा हा या कंपनीचा सीईओ होता. त्याने आता सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे कंपनीने काही काळासाठी व्यवहार बंद ठेवले होते. पण, गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कंपनी दिवाळखोर होण्याच्या मार्गावर होती, असा आरोप देशातील विक्रेत्यांनी केला आहे.
राज कुंद्राने १५ डिसेंबरला ई मेलद्वारे त्याचा राजीनामा पाठविला होता. त्यात त्याने लिहले होते की, ‘मी अधिकृतरित्या Best Deal TV च्या सीईओ पदावरून राजीनामा देत आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एके दिवशी शेवट होतो, असे मला वाटते. आम्ही जवळपास इंडस्ट्री काबीज करण्याच्या मार्गावर होतो. नोटाबंदी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय होता. पण, दुर्दैवाने तो आमच्या इंडस्ट्रीसाठी घातक ठरला’.