मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक बत्ती गूल झाल्याने पंधरा मिनिटांहून अधिक काळ स्टेशन परिसर अंधारात बुडाला होता.
विद्युत पुरवठ्यात ट्रीपींग झाल्याने पुरवठा खंडीत झाला होता. मात्र मध्य रेल्वेकडे इमर्जन्सी विद्युत सेवा असल्याने विद्युत पुरवठा २० मिनिटांनी पूर्ववत करण्यात आला.