सोशल मीडियावर बीएसएफ जवानाचा व्हिडीओ ‘व्हायरल’ झाल्यानंतर देशभर खळबळ माजली असतानाच, लष्करातील शिस्त अबाधित राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. निमलष्करी दलाच्या जवानांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे जवानांच्या काही तक्रारी असल्यास थेट मला सांगा, असे आवाहन काल, शुक्रवारी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केल्यानंतर गृहमंत्रालयाने जवानांच्या सोशल मीडियावरील वापराला चाप लावला आहे.
जवानांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी
