रणजी फायनल – मुंबई की गुजरात…कोण मारणार बाजी ?

रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने गुजरातसमोर 312 धावाचं आव्हान ठेवलं आहे. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा लक्ष्याचा पाठलाग करणा-या गुजरातने 47 धावांवर बिनवाद अशी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर गुजरातने आपले तीन विकेट्स गमावले असून सध्या जुनेजा आणि पार्थिव पटेल खिंड लढवत आहे. पार्थिव पटेलने 72 चेंडूत अर्धशतक पुर्ण केलं आहे. सामना अटीतटीचा होण्याची शक्यता असून बाजी नेमकी कोण मारणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे. पहिल्या सत्राअखेर गुजरातने तीन विकेट्स गमावत 146 धावा केल्या आहेत. विजयासाठी गुजरातला 166 धावांची गरज आहे.
मुंबईने गुजरातसमोर ठेवलेलं 312 धावाचं लक्ष्य पुर्ण केल्यास हा एक रेकॉर्ड असेल. इतकी मोठी धावसंख्या आतापर्यत तीन वेळाच पार करण्यात प्रतिस्पर्धी संघ यशस्वी ठरला आहे.. सोबतच पहिल्यांदा रणजी जिंकण्याची संधी गुजरातकडे आहे. दुसरीकडे मुंबईने आतापर्यंत 40 वेळा रणजी जिंकला असून शिरपेचात अजून एक तुरा रोवण्याची संधी त्यांच्याकडे आहे.
गतविजेते संघ –
२०१५-१६ – कर्नाटक
२०१३-१४  – कर्नाटक
२०१२-१३  – मुंबई
२०११-१२ – राजस्थान
रणजी करंडक सांघिक विक्रम
– सर्वात जास्त विजय – ४० (मुंबई)
– सर्वात जास्त धावा – ९४४/६ (घोषित) – हैद्राबाद वि. आंध्र – १९९३-९४
– सर्वात कमी धावा – २१/१० – हैद्राबाद वि. राजस्थान – २०१०
खेळाडूंचे विक्रम
– सर्वात जास्त धावा – ४४३ नाबाद – बी.बी.निंबाळकर – महाराष्ट्र वि. काठेवाड (सौराष्ट्र) – १९४८-४९
– सर्वात चांगली गोलंदाजी (डाव) – १०/२० – प्रेमांशू चटर्जी – बंगाल वि. आसाम – १९५६-५७
– सर्वात चांगली गोलंदाजी (सामना) – १६/९९ – अनिल कुंबळे- कर्नाटक वि. केरळ – १९९४-९५
दुसऱ्या डावात बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४११ धावांची मजल मारून गुजरातला विजयासाठी ३१२ धावांचे कठीण आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर गुजरातने बिनबाद ४७ अशी सुरुवात केली.
चौथ्या दिवशी ३ बाद २०८ धावसंख्येवरून सुरुवात करताना मुंबईने आक्रमक पवित्रा घेतला. अष्टपैलू अभिषेक नायरने पुन्हा एकदा मुंबईसाठी महत्त्वपूर्ण खेळी करताना १४६ चेंडूत ५ चौकार व ५ षट्कारांसह ९१ धावांची खेळी केली. कर्णधार आदित्य तरेनेही सावधपणे खेळताना ११४ चेंडूत १२ चौकारांसह ६९ धावांची खेळी केली. यादव आणि तरे बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना फारशी चमक दाखविता आली नाही. पुन्हा एकदा सिद्धेश लाड (१५) अपयशी ठरला, तर, बलविंदर संधू (२०), शार्दुल ठाकूर (१) आणि विशाल दाभोळकर (१२) दडपणाखाली बाद झाले.
चिंतन गजाने मुंबईकरांच्या फलंदाजीला खिंडार पाडताना १२१ चेंडूंत सहा बळी घेतले. आरपी सिंगने दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली, तर रुष कलारिया आणि हार्दिक पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
यानंतर, मोठ्या धावसंख्येचे आव्हान घेऊन उतरलेल्या गुजरातने चांगली सुरुवात केली. समित गोहेल याने सावध भूमिका घेत खेळपट्टीवर टिकून राहण्यावर भर दिला. दुसऱ्या बाजूने प्रियांक पांचाळने खराब चेंडूंचा चांगला समाचार घेताना गुजरातचा धावफलक हलता ठेवला. या दोघांच्या जोरावर गुजरातने चौथ्या दिवअखेर १३.२ षटकांत बिनबाद ४७ धावांची मजल मारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *