गायक महेश काळेंचा अमेरिकेत होणार कार्यक्रम

अमेरिकेतील मराठी जनांची ओळख असलेल्या महाराष्ट्र मंडळाने यंदाच्या मकरसंक्रांतीला प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांचा ‘सूर निरागस हो’ हा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
महाराष्ट्र मंडळाची नवी कार्यकारीणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहे. 21 जानेवारीला यलो बॉक्स ऑडिटोरिअममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. मकरसंक्रांतीच्या कार्यक्रमाने महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना सुरुवात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *