कुख्यात गुंड विठठ्ल शेलारचा भाजपमध्ये प्रवेश

 मुळशीतील कुख्यात गुंड विठठ्ल शेलारचा यांनी भाजपमध्ये प्रवेश  केला आहे. मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. विठठ्ल शेलार हा उरवडे गावाजवळील बोकरवाडीचा आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

२०१४ मध्ये त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हपासून तो तुरुंगात होता. ४ महिन्यांपूर्वी त्याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकींचे वारे वाहत आहे. या पार्श्वभूमीवर शेलारला पक्षात घेऊन पवित्र करून घेण्यात आल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *